Monday, May 11, 2009

अरे संसार संसार!

बराच काळ घराबाहेर राहिल्यामुळे आणि फारसा उत्साह/रस नसल्यामुळे स्वैंपाक कधीच केला नव्हता. खरं सांगायचं तर ज्या टिपिकल कारणांसाठी आपल्याकडे स्वैंपाक शिकण्याचा आग्रह धरला जातो त्याला विरोध असल्यामुळे माझ्या मनात एकप्रकारची अढी होती. आता परदेशी राहुन शिकयचं आणि सगळं स्वतः करायचं म्हटल्यावर स्वैंपाक शिकणं भाग होतं पण आता कारण वेगळं असल्यामुळे मी पण खूषीने तयार झाले. आई, आत्या, चित्रावहीनी, सगळ्या ताया यांच्याकडून क्रॅश कोर्स टिप्स आणि काही प्रात्यक्षिक ट्रेनिंग घेउन यूएसएला आले. आमच्या आधीच्या मेल्स मधून मी आणि श्रुती लिंबुटिंबू आणि इला आणि अश्विनी एक लेव्हल अप असल्याचं कळल होतं. इला आणि अश्विनी च्या भरवशावर मी निर्धास्त होते!! इथे आल्यावर पहिले १५ दिवस मजेचे होते..कॉलेज सुरु झालं नव्हत आणि त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ होता..मग आमचे स्वैंपाकाचे प्रयोग सुरु झाले! आम्ही सगळ्या जणी चवीने खाणार्या असल्यामुळे "काहीही चालेल" आणि काही नसलं तरी चालेल असा प्रकार नव्हता! आजही आमच्याकडे रात्रीचं जेवण साग्रसंगीत असतं!

स्वैंपाक म्हटला की मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी येतात! ग्रोसरी (त्याची यादी!), प्रत्यक्ष स्वैंपाक, नंतरची आवराआवरी, उरलंसुरलं इत्यादी.हे सगळं करायला लागल्यापासुन आमचा समस्त आयांबद्दलचा आदर शतगुणीत झाला आहे.. ..आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या रोज कोणती भाजी करायची हा प्रश्न सोडवतात हे!! दर वीकेन्ड ला पुढच्या आठवड्याच्या भाज्यांची यादी करताना आम्हाला याची आठवण येते!!

आता आम्ही चौघीजणी छान स्वैंपाक करायला शिकलो आहोत! पण प्रत्येकीची स्पेशल डिश आहे. चिंचगूळाची आमटी म्हणजे इला, वांग्याचं भरीत अश्विनी मस्त करते,श्रुतिच्या उसळी आणि मी...(स्वतः स्वतः ची स्तुती करणं योग्य नाही पण..) फ्लॉवर, कोबी आणि फरसबीची भाजी या माझ्या मते मला सगळ्यात चांगल्या जमलेल्या भाज्या आहेत! आता "चांगली जमलेली भाजी" ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. म्हणजे भाजी चांगली झाल्याचा आमचा/माझा निकष म्हणजे जी भाजी आपण खातो आणि जिची चव आपल्या जिभेवर आहे तशी भाजी जमली की मग ती चांगली भाजी! म्हणजे आई करते तशी फ्लॉवरची भाजी जमली की छान! आणि ती भाजी तशी होतेय की नाही याचा एक निकष म्हणजे भाजी करताना येणारा वास!! घरी जसा वास येतो तसा वास आला की मी खूष!! अशी मज्जा आहे! मला बरेचदा स्वैंपाक करताना तोत्तोचान मधल्या प्रसंगाची आठवण येते!! आणि हो जेवण्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कौतुक..एखाद्या जमलेल्या पदार्थाचं कौतुक झालं की इतकं मस्तं वाटतं! तो आनंद वेगळाच असतो आणि आम्ही एकमेकींना तो द्यायला कधीच विसरत नाही!

दर weekend ला आम्ही घर आवरतो. Thankfully आमच्या घरी wooden flooring आहे त्यामुळे केर काढणं आणि एकुणच साफसफाई करणं खूप सोपं जातं. Weekend चं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे laundry! इथल्या laundry ची मला आवडणारी गोष्ट म्हणजे dryer मधून कपडे सुकून बाहेर येतात ते! ते कपडे इतके छान गरम गरम असतात की मी एक नवीन phrase तयार केलेय : ताजे गरमागरम कपडे!!

इथे आल्यावर एक नवीन गोष्ट करायला लागलो ती म्हणजे खर्चाचा हिशोब. इथे apartment share करुन राहणारे बरेच लोकं वेगवेगळ्या sites वापरतात. आम्ही मात्र आल्यानंतर लगेच google documents मधे एक excel sheet बनवली..जाम मज्जा आली ती बनवताना! कोणते columns बनवायचे आणि शेवटी आपोआप हिशोब कसा लागेल असं full brain storming करुन / तासांच्या अथक परिश्रमानंतर ती excel sheet तयार झाली आणि आम्ही तीच वापरतो. पैसे खर्च केले की त्या शीटमधे entry करायची मग महिन्याच्या शेवटी आम्ही सगळा हिशोब clear करतो. आमची सगळ्यांची accounts एकाच बँकेत असल्यामुळे पैसे transfer करणे सोपे जाते. अमेरिकेत सर्व सोयी online उपलब्ध आहेत..म्हणजे जर एखाद्याने ठरवलं की आज कोणाही माणसाशी बोलता सर्व कामं करायची तर ते सहज शक्य आहे! दुकानात गेल्यावर self checkout करता येते, pin to piano सर्व गोष्टी online खरेदी करता येतात, पेट्रोल पंपावर आपले आपणच पेट्रोल भरुन घ्यायचे असते..एकदा bank account उघडले की बहुतेक सर्व व्यवहार online करता येतात. इतकच काय पोस्टाची कार्डं-पाकीटं देखिल online खरेदी करता येतात! एकटेपणा वाढवण्याच्या सर्व सोयी इथे बघायला मिळतात! पोस्टावरुन आठवलं..मला इथले stamps भयंकर आवडले..आपण वही/पुस्तकावर नावाचे sticker चिकटवतो ना तसे peel n stick पद्धतीचे stamps असतात्..किती भारी कल्पना आहे ही..आपल्या पोस्ट खात्याला हे असं करावं हे कसं सुचवता येईल?? (I am serious!!)

३१३ चे आमच्या सख्खे शेजारी म्हणजे आमच्या मालकीणबाई Dr. Mrs.Legett. आजी आजोबा दोघांचेही वय आता सत्तरीच्या पलिकडे आहे त्यामुळे ते फारसे बाहेर पडत नाहीत. अपार्टमेंट चा सर्व कार्यव्यवहार त्यांची मुलगी Ms.George Ann बघतात त्यांना देखिल आता नातवंडे आहेत! (इथे एकतर बरीच लवकर लग्न होतात नाही तर बरीच उशिरा!). त्या आठवड्यातले दिवस office मधे असतात. त्यांच्या मदतीला आणि अपार्टमेंट ची देखभाल करायला एक काका आहेत्..त्यांचं नाव आहे junior! आम्ही त्यांना गमतीने "बाळूकाका म्हणतो..कधी येताजाता दिसले तर नेहमी हसून हात हालवतात!

या तिघींचे खूप सारे भारतीय batchmates आहेत जे बर्याच वेळा घरी जाता university मधे timepass करत बसलेले असतात. श्रुती एकदा तिच्या मैत्रिणीच्या apartment मधे/ वर (Can’t figure out apt preposition!!) गेली होती तिथून परत आल्यावर तिने declare केलं की आपलं घर सगळ्यात भारी आहे! आम्हा चौघींनाही आता हा flat घरासारखा वाटतो! आणि म्हणुनच आमच्या पैकी प्रत्येकीला at the end of the day लवकर घरी यावसं वाटतं! You are welcome @313 Great Oaks anytime!!

Thursday, March 12, 2009

UT Open House 2009

गेल्या शनिवारी आमच्या युनिव्ह्र्सिटीचं ओपन हाउस होतं. आम्हाला ते काय असत याची फारशी कल्पना नव्हती पण खूप सारी शाळेतली मुलं युनिव्ह्र्सिटी बघायला येणार आणि त्या दिवशी युनिव्ह्र्सिटी आम जनतेसाठी खुली असणार एवढचं माहिती होतं. त्या शनिवारी मला नेमकं लॅब मधे काम होतं म्हणुन मी युनिव्ह्र्सिटीत जाण्यासाठी बस स्टॉप वर उभी होते. तेव्हा लक्षात आलं की खुप साऱ्या बसेस भरुन युनिव्ह्र्सिटी कडे जात आहेत (त्या दिवशी ३०० स्कू्लबसेस भरुन मुलं आली होती!!) मग मी श्रुतीला फोन केला आणि त्या दिवशीचे कार्यक्रम बघायला सांगितले. थोड्या वेळाने श्रुती चा मला फोन.."अगं खुप मज्जा आहे आज..४०० च्या वर कार्यक्रम आहेत!"

There was an event organized by English literature department where they were going to present (read and enact) an excerpt from the famous novel Pride and Prejudice! आम्ही दोघी Jane Austen fans असल्यामुळे त्या कार्यक्रमाला गेलो. On our way we literally had to make a way to walk through the crowds. Never ever saw so many people on campus at once! And there were so many attractions..face painting tattooing, making your own footprint in PoP students displaying their arts! But we wanted to go to reading session first. The event was conducted by 2 lady profs and it was simply great! They read and enacted the very last part of P&P where Lady Catherine comes to see Elizabeth and asks her not to marry Darcy. The older prof played Lady Catherine and younger one was Elizabeth. They wore those traditional costumes (which they made themselves!!). We really enjoyed listening to them. That was followed by a slide show where they showed snaps of Chawton Estate, the place in UK where JA spent the last and literary productive years of her life (1809-1817) where she wrote all her 5 novels. Both the profs did a great job explaining about the place with some friendly banter between them! The older lady was british and younger one was American and it seems now the entire Estate belongs to an American who bought it in a sale! So American prof taunted the British one “You people do not seem to care about your national monuments!!” So this old Brit lady replied..”Yeah..because we have so many of them!!”

त्या नंतर पुढचे / तास आम्ही दोघी जत्रेमधे हरवल्यासारख्या कँपसभर फिरत होतो!! सगळ्या departments नी शाळेतल्या मुलांना आकर्षित करतिल असे खेळ, वस्तू मांडल्या होत्या. त्यातुन मुलांना geology, chemistry, music, literature, computers, mechanical engg अशा अनेक विषयांची ओळख होत होती. ITS (Information Technology Services) नी used CDs and similar hardware बेंच वर मांडुन ठेवले होते आणि मुलं त्यातुन वस्तु बनवत होती. टाकाऊ मधून टिकाऊ त्यातला प्रकार! शिवाय आमचा लाडका Bevo (Longhorn) मुलांच्या भेटीला आला होता..

संध्याकाळी वाजता आजच्या सर्व कार्यक्रमांची Main Mall (University चे पटांगण)मधे सांगता होणार होती! That was the highlight of the day!! The UT Open House 2009 Class photograph! All the people who came to visit UT today gathered at the main mall. The famous Longhorn band was played (actually one could rehearse with the band and march with them to the main mall!!) And then from the top of the tower a photograph was taken featuring each individual present at the mall!! This photograph is taken from a very high definition camera so if you download it from the website and zoom in you can see each and every person out there!! Last year they made a UT letter symbol by drawing BIG U and T on the floor and making all the people stand around it (negative shading type). This year it was state of Texas map drawn on the floor and all stood inside creating a huge Texas!! We wanted take pics of the entire event so we did not stand with the crowd. But the event was a hit!! As you will see in the videos and fotos in the album.

मी आणि श्रुती नी त्या दिवशी खूप मजा केली! आणि हो फक्त लहान मुलंच आली होती अस नाही. अनेक पालक (आई-बाबा, आजी-आजोबा) जे UT alumni आहेत आपल्या मुलांना नातवंडांना घेउन आले होते. इतकी माणसे कँपस वर असून सुद्धा कुठेही गडबड गोंधळ नव्हता. सगळं अतिशय सुनियोजित आणि नीटनेटकं होतं. मला आणि श्रुतीला हे सारं पाहाताना " आपल्या इथे असं झालं पाहीजेअसं वाटतं होतं. आपल्याकडे देखिल असे बरेच कार्यक्रम होतात पण आपण planning मधे कमी पडतो. We must learn how to plan things in a better way. सगळं शक्य आहे फक्त थोडी इच्छाशक्ती हवी!

Wednesday, February 18, 2009

जे वेड मजला लागले!

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा मी भारतात होते. आधीचं एकही सारेगमप पर्व मी पाहिलं नव्हतं.फार फार तर टीका करण्यापुरता एखादा episode पाहीला होता..पण लिटिल चॅम्प्स सुरु झाल्यापासुन जी मज्जा सुरु झाली ती महिन्यांच्या आनंदपर्वाची सुरुवात होती! इथे आल्या आल्या भारतातल्या सर्व करमणुकीच्या sources चा शोध लागला त्यातुन मग YouTube, GluTV, marathitube, aapalimarathi अशा सगळ्या websites बघणं सुरु झालं. लिटिल चॅम्प्सचं मनावरचं गारुड दिवसेंदिवस वाढतच गेलं. Finals सुरु झाल्या आणि आपल्या आवडत्या लिटिल चॅम्प्साठी fielding लावणं सुरु झालं! आयुष्यात पहिल्यांदा कुठल्याही टिव्ही शो मधे इतकी involvement वाटतं होती.

या सर्वच लिटिल चॅम्प्स नी इतका आनंद दिला!! अजुनही देत आहेत. मला लिटिल चॅम्प्स ने काय दिलं असा विचार केला की कित्तीतरी गोष्टी सुचू लागतात. मराठी गाणी ऐकणं आधीदेखिल आवडत होतच पण आता आम्हा सगळ्यांना त्या गाण्यांची गोडी लागली आहे. येताजाता आता ओठांवर मराठी गाणी असतात. आधी कधी ऐकलेल्या नाट्यगीतापासून ते थेट आजच्या मोरया मोरया पर्यंत!!

आणि ही सगळी मुलं आता अक्षरशः "घरातली" झाली आहेत!! कोकणकन्या शमिका, pretty young girl आर्या, उकडीचा मोदक प्रथमेश, little monitor मुग्धा, little record-maker कार्तिकी, future combo music director रोहित, शाल्मली (टिपरे) सुखटणकर, अवंती सगळेच!! मला गाण्यातलं फारसं काही कळत नाही पण ही मुलं जे गात होती ते त्यांच्या वयाच्या पलीकडलं होतं एवढं नक्की! त्यांच्या सगळ्या गाण्यांमधे झालेल्या गमती-जमती, काही अविस्मरणीय episodes (शन्कर महादेवन, हरिहरन, ह्रदयनाथ मंगेशकर मान्यवर परीक्षक म्हणुन आले होते ते episodes आणि दिवाळी विशेष, २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर झालेला श्र्द्धांजली चा भाग आणि खास पं ह्रदयनाथ मंगेशकरांनी गाणी बसवून घेतलेला २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेष भाग ) पुन्हा पुन्हा बघावसे वाटतात!

लिटिल चॅम्प्समुळे अवधूत आणि वैशाली ची मनातली केवळं remix गाणारे अशी image बदलली. त्यांच्या friendly वागण्यामुळे ही मुलं एकदम लवकर रुळली यात शंकाच नाही. ती दोघंही या मुलांचा दर्जा पाहता best judges नव्हते but they both did the best job!! वाद्यवॄंद एक नंबर आणि पल्लवी….ती तर कार्यक्रमाची शान आहे!! तिचं इंग्रजीमिश्रीत मराठी खिल्ली उडवायला मस्तच.."दोन्ही गाण्यांसाठी दोन्ही परीक्षकांकडून दोन दोन नी!!" ह्या वाक्याचा अर्थ तीच सांगू शकेल कदाचित!! अवधूत चं चाबूक, वैशालीचं भन्नाट सगळच अड्डस!!

मस्ती की पाठशाला च्या episodes मधे ही पोरं जी धमाल करत होती ती पहायला देखिल धमाल यायची!! संपूर्ण कार्यक्रमादरम्यान या सर्व मुलांनी जी खिलाडुवॄत्ती आणि maturity दाखवली तिने मनाला खुप दिलासा मिळाला. त्यांच्या पालकांचं देखिल खुप कौतुक वाटते. आर्याचे बाबा प्रथमेश च्या गाण्याला once more द्यायचे, या सगळ्या मुली मिळुन बिचार्या मुग्धाला इंग्रजी वरुन चिडवत असताना आर्याच्या आई तिची बाजु घ्यायची! या कार्यक्रमाची एक वेगळीच भट्टी जमली होती निर्मळ निखळ पवित्र आनंदाची..

माझ्यासाठी सगळेच लिटिल चॅम्प्स जिंकले कारण त्यांनी सर्वांची मनं जिंकली! आजही जेव्हा bore होतं, चिडचिड होते अशावेळी मी आपली लिटिल चॅम्प्स ची playlist लावते आणि मग डोळ्यांपुढे ती दॄश्य दिसायला लागतात, ओठांवर हसू येते आणि नकळत मन प्रसन्न होउन जातं!!