Monday, May 11, 2009

अरे संसार संसार!

बराच काळ घराबाहेर राहिल्यामुळे आणि फारसा उत्साह/रस नसल्यामुळे स्वैंपाक कधीच केला नव्हता. खरं सांगायचं तर ज्या टिपिकल कारणांसाठी आपल्याकडे स्वैंपाक शिकण्याचा आग्रह धरला जातो त्याला विरोध असल्यामुळे माझ्या मनात एकप्रकारची अढी होती. आता परदेशी राहुन शिकयचं आणि सगळं स्वतः करायचं म्हटल्यावर स्वैंपाक शिकणं भाग होतं पण आता कारण वेगळं असल्यामुळे मी पण खूषीने तयार झाले. आई, आत्या, चित्रावहीनी, सगळ्या ताया यांच्याकडून क्रॅश कोर्स टिप्स आणि काही प्रात्यक्षिक ट्रेनिंग घेउन यूएसएला आले. आमच्या आधीच्या मेल्स मधून मी आणि श्रुती लिंबुटिंबू आणि इला आणि अश्विनी एक लेव्हल अप असल्याचं कळल होतं. इला आणि अश्विनी च्या भरवशावर मी निर्धास्त होते!! इथे आल्यावर पहिले १५ दिवस मजेचे होते..कॉलेज सुरु झालं नव्हत आणि त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ होता..मग आमचे स्वैंपाकाचे प्रयोग सुरु झाले! आम्ही सगळ्या जणी चवीने खाणार्या असल्यामुळे "काहीही चालेल" आणि काही नसलं तरी चालेल असा प्रकार नव्हता! आजही आमच्याकडे रात्रीचं जेवण साग्रसंगीत असतं!

स्वैंपाक म्हटला की मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी येतात! ग्रोसरी (त्याची यादी!), प्रत्यक्ष स्वैंपाक, नंतरची आवराआवरी, उरलंसुरलं इत्यादी.हे सगळं करायला लागल्यापासुन आमचा समस्त आयांबद्दलचा आदर शतगुणीत झाला आहे.. ..आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या रोज कोणती भाजी करायची हा प्रश्न सोडवतात हे!! दर वीकेन्ड ला पुढच्या आठवड्याच्या भाज्यांची यादी करताना आम्हाला याची आठवण येते!!

आता आम्ही चौघीजणी छान स्वैंपाक करायला शिकलो आहोत! पण प्रत्येकीची स्पेशल डिश आहे. चिंचगूळाची आमटी म्हणजे इला, वांग्याचं भरीत अश्विनी मस्त करते,श्रुतिच्या उसळी आणि मी...(स्वतः स्वतः ची स्तुती करणं योग्य नाही पण..) फ्लॉवर, कोबी आणि फरसबीची भाजी या माझ्या मते मला सगळ्यात चांगल्या जमलेल्या भाज्या आहेत! आता "चांगली जमलेली भाजी" ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. म्हणजे भाजी चांगली झाल्याचा आमचा/माझा निकष म्हणजे जी भाजी आपण खातो आणि जिची चव आपल्या जिभेवर आहे तशी भाजी जमली की मग ती चांगली भाजी! म्हणजे आई करते तशी फ्लॉवरची भाजी जमली की छान! आणि ती भाजी तशी होतेय की नाही याचा एक निकष म्हणजे भाजी करताना येणारा वास!! घरी जसा वास येतो तसा वास आला की मी खूष!! अशी मज्जा आहे! मला बरेचदा स्वैंपाक करताना तोत्तोचान मधल्या प्रसंगाची आठवण येते!! आणि हो जेवण्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कौतुक..एखाद्या जमलेल्या पदार्थाचं कौतुक झालं की इतकं मस्तं वाटतं! तो आनंद वेगळाच असतो आणि आम्ही एकमेकींना तो द्यायला कधीच विसरत नाही!

दर weekend ला आम्ही घर आवरतो. Thankfully आमच्या घरी wooden flooring आहे त्यामुळे केर काढणं आणि एकुणच साफसफाई करणं खूप सोपं जातं. Weekend चं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे laundry! इथल्या laundry ची मला आवडणारी गोष्ट म्हणजे dryer मधून कपडे सुकून बाहेर येतात ते! ते कपडे इतके छान गरम गरम असतात की मी एक नवीन phrase तयार केलेय : ताजे गरमागरम कपडे!!

इथे आल्यावर एक नवीन गोष्ट करायला लागलो ती म्हणजे खर्चाचा हिशोब. इथे apartment share करुन राहणारे बरेच लोकं वेगवेगळ्या sites वापरतात. आम्ही मात्र आल्यानंतर लगेच google documents मधे एक excel sheet बनवली..जाम मज्जा आली ती बनवताना! कोणते columns बनवायचे आणि शेवटी आपोआप हिशोब कसा लागेल असं full brain storming करुन / तासांच्या अथक परिश्रमानंतर ती excel sheet तयार झाली आणि आम्ही तीच वापरतो. पैसे खर्च केले की त्या शीटमधे entry करायची मग महिन्याच्या शेवटी आम्ही सगळा हिशोब clear करतो. आमची सगळ्यांची accounts एकाच बँकेत असल्यामुळे पैसे transfer करणे सोपे जाते. अमेरिकेत सर्व सोयी online उपलब्ध आहेत..म्हणजे जर एखाद्याने ठरवलं की आज कोणाही माणसाशी बोलता सर्व कामं करायची तर ते सहज शक्य आहे! दुकानात गेल्यावर self checkout करता येते, pin to piano सर्व गोष्टी online खरेदी करता येतात, पेट्रोल पंपावर आपले आपणच पेट्रोल भरुन घ्यायचे असते..एकदा bank account उघडले की बहुतेक सर्व व्यवहार online करता येतात. इतकच काय पोस्टाची कार्डं-पाकीटं देखिल online खरेदी करता येतात! एकटेपणा वाढवण्याच्या सर्व सोयी इथे बघायला मिळतात! पोस्टावरुन आठवलं..मला इथले stamps भयंकर आवडले..आपण वही/पुस्तकावर नावाचे sticker चिकटवतो ना तसे peel n stick पद्धतीचे stamps असतात्..किती भारी कल्पना आहे ही..आपल्या पोस्ट खात्याला हे असं करावं हे कसं सुचवता येईल?? (I am serious!!)

३१३ चे आमच्या सख्खे शेजारी म्हणजे आमच्या मालकीणबाई Dr. Mrs.Legett. आजी आजोबा दोघांचेही वय आता सत्तरीच्या पलिकडे आहे त्यामुळे ते फारसे बाहेर पडत नाहीत. अपार्टमेंट चा सर्व कार्यव्यवहार त्यांची मुलगी Ms.George Ann बघतात त्यांना देखिल आता नातवंडे आहेत! (इथे एकतर बरीच लवकर लग्न होतात नाही तर बरीच उशिरा!). त्या आठवड्यातले दिवस office मधे असतात. त्यांच्या मदतीला आणि अपार्टमेंट ची देखभाल करायला एक काका आहेत्..त्यांचं नाव आहे junior! आम्ही त्यांना गमतीने "बाळूकाका म्हणतो..कधी येताजाता दिसले तर नेहमी हसून हात हालवतात!

या तिघींचे खूप सारे भारतीय batchmates आहेत जे बर्याच वेळा घरी जाता university मधे timepass करत बसलेले असतात. श्रुती एकदा तिच्या मैत्रिणीच्या apartment मधे/ वर (Can’t figure out apt preposition!!) गेली होती तिथून परत आल्यावर तिने declare केलं की आपलं घर सगळ्यात भारी आहे! आम्हा चौघींनाही आता हा flat घरासारखा वाटतो! आणि म्हणुनच आमच्या पैकी प्रत्येकीला at the end of the day लवकर घरी यावसं वाटतं! You are welcome @313 Great Oaks anytime!!