Sunday, January 3, 2010

Reflections!

सरत्या वर्षाला निरोप देताना मनात अनेक आठवणी दाटल्या आहेत..त्यांचा हा पट...जसा मनात उलगडत गेला तसा..


आमच्या घराशेजारीच ऑस्टिन मधलं एक मोठं हॉस्पिटल आहे, सेंट डेव्हिड्स नावाचं. तिथे दिवसरात्र वर्दळ सुरु असते, ambulance , मालवाहू ट्रक आणि कंटेनर्स ची. त्यापलीकडूनच IH ३५ नावाचा हायवे जातो. या सगळ्यामुळे आमच्या आसपास सतत जाग असते. Ambulance चे sirens, ट्रकचे reversing horns आणि indicators आणि हो हॉस्पिटल च्या टेरेस वर एक halipad देखील आहे त्यामुळे बऱ्याचदा emergency cases घेऊन helicopter तिथे land होते त्याचाही आवाज. मला सतत प्रश्न पडायचा : हे कसं चालतं? म्हणजे हॉस्पिटल मधल्या patients ना या ध्वनी प्रदूषणाचा त्रास कसा होत नाही? काही दिवसांपूर्वी माझ्या एका would be डॉक्टर मैत्रिणीला विचारलं तर ती म्हणाली "अगं! इथली हॉस्पिटल्स sound proof असतात! घ्या!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जगी सर्व सुखी असा कोण आहे? असा एक अवघड प्रश्न रामदासांनी साऱ्या जगाला कधीचा विचारून ठेवला आहे! या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो तर "आपण तर नाही बा! असेल कोणीतरी" किंवा "ह्या कोणीच नाही!" असे पर्याय आपल्या डोक्यात तरळून जातात! पण काही क्षणांसाठी का होईना या प्रश्नाला "मी" असे उत्तर द्यावेसे वाटते! To be precise "मी cheesecake खाताना!" cheesecake हा एका प्रकारचा केक आहे या पलीकडे या खाद्यप्रकाराचे वर्णन करण्यात फारसा अर्थ नाही कारण तो खाऊनच पाहीला पाहिजे अशा category तला पदार्थ आहे! इथे cheesecake factory नावाचे केवळ cheesecakes साठी प्रसिद्ध असे दुकान आहे तिथला चीजकेक सर्वात भारी! अजून एक गोष्ट म्हणजे चीजकेक जसा शिळा होतो तशी त्याची चव अधिक चांगली होत जाते असा आमचा अनुभव आहे! आपली पुरणपोळी कशी तसा. अहाहा! आता यापुढे फार लिहित नाही! एक बार खाओगे तो तुम भी कहोगे..जगी सर्व सुखी असा/अशी मीच! लागली बेट!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्याकडे ज्याला graduation म्हणतात त्या शिक्षणाला अमेरिकेमध्ये undergraduate studies म्हणतात. मी मागच्या एका मेल मध्ये मला teaching assistant म्हणून काम करताना आलेले काही अनुभव लिहिले होते. त्यात यावर्षी अजून भर पडली. इथे undergraduation करणाऱ्या मुलांबद्दल माझा कौतुकादर वाढला आहे! याचं महत्वाचं कारण म्हणजे इथल्या शिक्षण पद्धतीत मुलांना फार pro-active असावं लागतं. आपल्याकडे एकदा डिग्री कॉलेज ला admission घेतली की विद्यार्थ्यांनी वेळेवर आपापल्या वर्गात किंवा lab मध्ये पोचले की झाले. विविध विषयांचे शिक्षक स्वत: वर्गात येऊन शिकवून जातात. शिवाय मी या वर्षी कोणते विषय शिकू? असा कधी प्रश्न पडत नाही. एकदा का specialization कोणते हे ठरले की दरवर्षी ठरलेले विषय आपण घेत जातो. University एकत्रित सर्व विषयांच्या परीक्षा घेते निकाल लावते. या उलट इथे असंख्य पर्याय उपलब्ध असल्यामुळे साचेबंद अभ्यासक्रम नसतो. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे आणि वेळ असेल तसे courses घेतो. एकदा register केल्यावर त्या course चे lecture जिथे होणार असेल तिथे पोचण्याची जबाबदारी विद्यार्थावर असते. प्रत्येक course च्या त्या शिक्षकाने आखलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होतात. त्यामुळे एका दिवशी दोन विषयांची परीक्षा असू शकते. एका lecture नंतर होणारे दुसरे lecture हे university च्या पार दुसऱ्या टोकाला असणाऱ्या इमारतीत असू शकते. त्यामुळे इथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला जागरूक असावे लागते. pro-active असावे लागते. या साऱ्या गोष्टी Fall semester मध्ये TA म्हणून काम करताना नव्याने जाणवलेल्या!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इथे आल्यापासून माझा एका गोष्टीचा count up सुरु झाला आहे तो म्हणजे "याची देही याची डोळा किती nobel laureates ना पाहिलं आणि ऐकलं" याचा. आत्तापर्यंतचा score आहे तीन. पैकी दोन हे medicine मधले Nobel विजेते आहेत. मला खास करून सांगावेसे वाटते ते तिसऱ्या व्यक्तीबद्दल आणि ती व्यक्ती म्हणजे नोबेल पीस प्राईज विजेत्या इराणच्या स्त्री मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या शिरीन इबादी. UT च्या Iranian studies center तर्फे त्यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते त्याला मी गेले होते. (ही मे मधली गोष्ट आहे कारण सध्या त्यांना इराण सरकार ने अटक केली आहे.) भाषणाला बरीच गर्दी होती. आम्हाला उशीर झाल्यामुळे मुख्य सभागृहामध्ये बसता आला नाही. शेजारच्या एका conference room मध्ये प्रोजेक्टर लावून लोकांची सोय केली होती तिथे बसावे लागले. त्या भाषणाला उभ्या राहिल्या आणि आश्चर्याचा पाहिलं धक्का बसला..त्यांनी चक्क इराणी भाषेतून बोलायला सुरुवात केली! एक मुलगी त्यांच्या प्रत्येक वाक्याचं इंग्रजी भाषांतर करीत होती. त्यांने साधारण एक अर्धा पाऊण तास भाषण केले. त्यात जाता जाता अमेरिकन सरकार ला कोपरखळ्या देखील मारल्या! इराण मधील एकूण परिस्थिती आणि त्याला जबाबदार असलेली सरकारी धोरणं यावर कडाडून टीका केली. त्यांच्या काही वाक्यांना भाषांतरापुर्वीच हशा आणि टाळ्या मिळत होते त्यावरून दोन्ही सभागृहात इराणी जाणणाऱ्या लोकांची संख्या बर्यापैकी होती असं जाणवलं! त्या नंतर प्रश्नोत्तरे झाली. त्यात एका श्रोत्याने : तुम्ही एवढ्या प्रसिद्ध असल्यामुळे तुम्ही इराण सरकार वर अशी मोकळेपणी टीका करू शकता..सरकार तुम्हाला काही जेल मध्ये टाकणार नाही मात्र सर्वसामान्य जनतेने कसे करावे?" असा प्रश्न विचारलं. त्यावर त्यांनी सुरुवातीला "तुम्ही मला अटक होणार नाही अशी इच्छा व्यक्त केलीत त्याबद्दल मी तुमची आभारी आहे!" असे म्हणाल्यावर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला! (आणि खरोखरीच आज त्या जेल मध्ये आहेत!). प्रश्नोत्तरे संपली, आभार प्रदर्शन झाले आणि लोक जाऊ लागले. मी म्हटलं " moniter वर पाहून उपयोग नाही आपण मुख्य सभागृहात जाऊन त्यांना प्रत्यक्ष पाहिलंच पाहिजे असा विचार करत मी hall च्या दारात उभी असताना अचानक लोकांचा गलका झाला आणि बघते तो माझ्या समोर अगदी हाताच्या अंतरावर प्रत्यक्ष शिरीन इबादी येऊन उभ्या! पाहिलं आणि आश्चर्याचा दुसरा धक्का बसला! त्या तर उंचीने माझ्यापेक्षाही बुटक्या होत्या! प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा आणि त्यावर गोड हसू! पाहूनच मस्त वाटलं! जेव्हा त्यांना कळलं की शेजारच्या सभागृहामध्ये देखील काही श्रोते बसले आहेत तेव्हा त्यांना भेटायला म्हणून त्या लगेच आमच्या इथे आल्या!

त्यांनी आमचे सर्वांचे आभार मानले! खूप सारे जण त्यांच्याशी हस्तांदोलन करत होते, इराणी भाषेतून संवाद साधत होते. तेवढ्यात मी पाहिले की एक अमेरिकन बाई त्यांच्यापाशी आली.तिच्या चेहऱ्यावरून तिला बरेच सांगायचे आहे असे वाटत होते पण भाषेचा अडसर होता! आणि मग त्या सहा फुट उंच बाईने पावणेपाच फूट उंच शिरीन इबादींची केवळ पाठ थोपटली! आणि शिरीन इबादींनी देखील "शब्दावाचून कळले सारे" अशी नजरेतून पावती दिली! माझ्या तर डोळ्यात पाणीच आले! एका वेगळ्याच enlightened mood मध्ये मी ती संध्याकाळ घालवली!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कुठल्याही लहान मुलाच्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते ती भाषा ते मूल आपोआप शिकत जातं. पण हे असं मोठेपणी देखील शक्य असेल तर एक दोन वर्षात मला चीनी भाषा यायला काहीच हरकत नाही! कारण lab मध्ये काम करत असताना सतत तीच भाषा कानी पडत असते! अमेरिकेत येऊन माझ्या चीन विषयीच्या ज्ञानात एवढी भर पडेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं! चीनी किंवा कोरिअन लोक जन्मलेल्या बाळाचं वय एक वर्ष मानून त्यापुढे वय मोजायला सुरुवात करतात! ही इंटरेस्टिंग गोष्ट मला इथे येऊनच कळली! सध्याच्या चीन सरकार ने शाळांमधून "जगात देव नाही " असं शिकवल्यामुळे नवीन चीनी पिढी ही कोणताही देव/ धर्म मानत नाही! I found it very difficult to believe that they actually don't believe in anything! मला जेव्हा आमच्या lab मधल्या post doc नी हे सांगितलं तेव्हा मी मनात सहज एक कल्पना केली..जर असं भारतात झालं तर?!!..आपल्यापैकी प्रत्येकाला वेगळं काहीतरी करण्यासाठी / महिने सहज मिळतील! काहीजण तर बेकार ही होतील कदाचित! इतकं आपलं जीवन "देव" या संकल्पनेशी जोडलं गेलं आहे! पण मग जीवन निरस देखील होईल हे पण तितकंच खरं!

मात्र माझ्या अजून एका चीनी सहकाऱ्याने मला हे आवर्जून सांगितले की बीजिंग, शांघाय म्हणजे चीन नव्हे! या शहरांकडे पाहून जितका वाटतो तितका चीन अजून विकसित झाला नाहीये. China is still developing. आणि भारताप्रमाणेच तिथे ही आर्थिक विषमता आहे मात्र सरकारच्या कडक बंधनांमुळे साऱ्या गोष्टी जगापुढे येऊ शकत नाहीत! चीनी लोकांना देखील भारताविषयी प्रचंड कुतूहल असतं! एकदा Ling ने मला डबा खाताना विचारले "भारतीय लोकांमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण किती?" मी म्हटलं, "तसं सांगणं अवघड आहे पण ५०% तरी नक्की असेल. पण nonveg खाणारे भारतीय देखील सहसा pork, ham किंवा beef खात नाहीत." आणि मग तिचा पुढचा प्रश्न आला..."मग इंडिया मध्ये pigs नसतीलच ना?!!!"....मी महत्प्रयासांनी हसू आवरलं! म्हटलं "असंच काही नाही..आहेत ना इंडियात pigs!"

"पण मग काय करता तुम्ही त्यांचं?" पुढचा प्रश्न!! आता माझी खरी पंचाईत झाली! भारतात डुक्कर कोणी खात नाही तर मग भारतात डुक्करं आहेत तरी कशासाठी!.."Well, मी तिला म्हटलं We don't rear pigs you know but you do find some stray pigs around the marketplaces!" अजून काय सांगू! मनात म्हटलं भारतातली डुक्करं कशी असतात ते बघितलस तर जन्मात पुन्हा कधी pork खाणार नाहीस!

असो!! तर तुम्हा सर्वांना (थोड्या उशिरा का होईना) नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!! हे वर्ष सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारे ठरो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! Happy new year!!

Wednesday, October 7, 2009

एका गज़लेची गोष्ट!

स्थळ: मुलुंड वेळ: रात्रीची काळ: TYBSc

नुकतीच सुरु झालेली मुंबईतली एफ एम रेडीओ स्टेशन्स आणि त्यांनी लावलेली जुन्या हिंदी गाण्यांची अवीट गोडी! माझा made in china FM radio आणि स्वरांच्या राज्यातून स्वप्नांच्या राज्यात प्रवेश करणारी मी! कानात जगजीत सिंगांचा तलम मुलायम आवाज ऐकू येतो आणि निद्रेच्या दिशेला निघालेली माझी पावलं थबकतात.

मैं कैसे कहूं जानेमन तेरा दिल सुने मेरी बात|

ये आखोंकी स्याही ये होठोंका उजाला

यहीं है मेरे दिन रात|

"या ओळी लक्षात ठेवायच्या बर का! " मी मनाला बजावते आणि सुरांच्या साथीने झोपी जाते!

आधीच माझी स्मरणशक्ती दिव्य त्यात अर्धवट झोपेत ऐकलेल्या गज़लेच्या ओळी कुठून लक्षात राहायला! दिवस गेले, महिने गेले आणि ती गज़ल हळूहळू मनाच्या नजरेआड गेली.

पुन्हा अशीच एक रात्र.

स्थळ: खोपोली काळ: TYBSc बहुतेक जानेवारी महिना.

त्यावेळी मी दर शनिवार-रविवार खोपोलीला जायचे. ही आठवण मात्र माझ्या मनात काल घडल्या इतकी ताजी आहे. का, कसे माहिती नाही पण कधी कधी आपल्या मनात दोन अगदी भिन्न गोष्टींचे धागे एकाच आठवणी भोवती गुंफलेले असतात. एखादा वास आपल्याला स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडून पार तिसरीकडेच घेऊन जातो ना तशी एखादी आठवण आपल्याला अनेक unrelated गोष्टी एकत्र आठवायला भाग पाडते. ( आता ह्याला विषयांतर म्हणू की प्रास्ताविक?)

असो..तर पुन्हा एकदा खोपोलीच्या घरातली ती रात्र. मी आपल्या उद्योगात दंग आई- बाबा त्यांच्या त्यांच्या. नेहमीप्रमाणे रात्रीचा रेडीओ चालू. अचानक कानावर त्याच गज़लेचे सूर! Recognize व्हायला दोन सेकंद जातात आणि मग माझी हातातलं काम सोडून कागद पेन शोधण्याची धावपळ! आयत्या वेळी कधीही सापडणाऱ्या दोन वस्तू म्हणजे चालणारं पेन आणि कोरा किंवा निदान पाठकोरा कागद! मी रेडीओ शेजारच्या Box मधून हाताला लागेल ते उपसत असते. शेवटी एक चालणारं पेन हाती लागतं. समोर कुठल्याशा तारखेचा पेपर पडलेला असतो तो उचलते आणि त्या गज़लेचा मुखडा खरडते. चला! आता मात्र ही गज़ल नक्की शोधायची! त्या आनंदात गज़लेचा मुखडा गुणगुणते. बाप रे! किती पसारा केलाय आपण! आता हे सगळं आवरलं पाहिजे नाहीतर आई उगीच चिडचिड करेल! Box मधल्या गोष्टी आत टाकताना हातात येतं एक earbuds चं उघडलेलं पाकीट...मीच आणलेलं....साधारण महिन्याभरापूर्वी....आजीसाठी...आजी....त्या पाकिटाकडे पाहताना "आता आजी नाही" ही क्रूर वास्तवाची जाणीव कुठेतरी खोल काळीज चिरत जाते आणि मी ढसाढसा रडायला लागते. जरा वेळाने आपोआप स्वत: शांत होते. एका हातात गज़लेच्या ओळी खरडलेला जुना पेपर...दुसऱ्या हातात earbuds चं पाकीट..आणि मनात कुठेतरी गज़लेचे सूर आणि आजीच्या आठवणी एकत्र दाटून आलेल्या….!

पिक्चर मध्ये दाखवतात ना तसा जाणारा काळ लिहिण्यातून दाखवता आला असता तर किती छान झालं असतं! त्या रात्रीनंतर जवळपास चार वर्षं सरली. मधल्या काळात गज़लेचा मुखडा माझ्या ओठांवर रुळला होता. मला जे जे संगीतप्रेमी/गज़लप्रेमी लोक भेटले त्यांना मी माझ्या 'सुमधुर आवाजात या दोन ओळी ऐकवून "आपण यांना पाहिलंत का?" च्या चालीवर या गज़लेची चौकशी करत होते! ही जगजीत सिंग यांनी गायलेली गज़ल आहे आणि कधी काळी मुंबईच्या रेडीओ स्टेशन्स वर अधूनमधून लागायची यापलीकडे माझ्याकडे काहीही माहिती नव्हती.

आता पुन्हा एक रात्र! स्थळ: ऑस्टिन वेळ: रविवार रात्र

अतिशय आळसात घालवलेला रविवारचा दिवस संपताना लागणारी हुरहूर आणि आणि at the same time ठरवलेली कामं केल्याबद्दल छळणारा आपला conscience अशा मूड मध्ये मी! laptop पुढ्यात घेऊन इकडच्या तिकडच्या साईट्स बघतेय. कशी काय कोण जाणे पण मी cooltoad वर गज़ल च्या catagory मध्ये शिरले आणि अचानक आठवली ती ही गज़ल! अरेच्चा! इतके दिवस आपल्याला ही गज़ल शोधायचं कसं नाही सुचलं? मनात येताक्षणी मी गुगलोबांना कामाला लावलं आणि पुढच्या पाच मिनिटांत मी ती गज़ल माझ्या laptop वर download केली होती! जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हा डोळ्यांतून साऱ्या आठवणी दाटल्या!

गेले दोन/तीन दिवस माझ्या ipod वर हीच गज़ल वाजते आहे! “ये आँखोंकी स्याही ये होठोंका उजालापेक्षा ये होठोंकी स्याही ये आंखोंका उजालाकसं जास्ती अर्थपूर्ण वाटतं या निरर्थक वादात मनाला अडकवता मी आता केवळ आनंदासाठी ही गज़ल ऐकतेय!

अशी आहे या गज़लेची गोष्ट!..सुफळ पण संपूर्ण नव्हे! कारण इतके दिवस या गज़लेच्या केवळ आठवणी माझ्यासोबत होत्या पण आता आहे ती गज़ल आणि काही स्वप्नं..या गज़लेच्या साथीनेच खरी व्हावीत अशी!