ह्या अनुभवाबद्दल मला बरेच दिवस लिहायचंच होतं. स्वतःची ठाम मते असलेली (opinionated) दोन माणसं जेव्हा संवाद साधतात तेव्हा काय होतं? मी स्वतः या कॅटॅगरीत मोडत असल्याने ह्या प्रसंगांचा मला बराच अनुभव आहे. या साऱ्या अनुभवांत काहीतरी समानता आहे हे मला जाणवत होतं पण ते नक्की काय हे उमजायला जरा वेळ लागला. तर हा शोध काय आहे ते मला सांगितलंच पाहिजे कारण तो इंटरेस्टिंग आहे आणि उपयोगीदेखील!
बरेचदा कसं असतं की कोणत्याही गोष्टीला दोन (वा अधिक) बाजू असतात आणि कोणतीही एक बाजू संपूर्णपणे चूक किंवा बरोबर असत नाही. परिस्थितीप्रमाणे किंवा व्यक्तीसापेक्ष योग्य बाजू बदलत असते. किंवा बरेचदा तो एक choice असतो. म्हणजे कधी कधी I could have gone either way but I could choose only one so I chose this इतका सोपा. पण समजा त्या निर्णयावर किंवा अशा एखादया subjective विषयावर (उदा. लिव्ह इन रिलेशनशिप) दोन opinionated व्यक्ती बोलू लागल्या की काय होतं? मी सांगते! त्यांचं फार कमी वेळा एकमत होतं! कारण जर एका व्यक्तीने एक बाजू उचलून धरली तर दुसऱ्या व्यक्तीला बरेचदा दुसरी बाजू उचलून धरण्याची खुमखुमी येते! (मला येते! खोटं का बोला!) दोन्ही बाजूंना आपापले pros and cons असतातच ! (बरेचसे मुद्दे दोघांना माहिती असले तरी) त्यामुळे थोडा काळ वाद होतो आणि गाडी एका नेहमीच्या वळणावर येऊन थांबते. आता depending on the situation and subject ह्यात बरीच variations होऊ शकतात पण pattern फारसा बदलत नाही.
'वादे वादे जायते तत्वबोध:' हे जरी खरं असलं तरी अनेक वेळा ह्या वादांतून वेळेच्या आणि उर्जेच्या अपव्ययाखेरीज काही हाती लागत नाही. बरेचदा हे वाद घालणाऱ्या व्यक्ती पुरेशा सुज्ञ आणि विचारी असतात त्यामुळे दुसरी बाजू त्यांनाही व्यवस्थित दिसत असतेच! (आणि जर कोणी एक डोळ्यावर झापडं बांधून वाद घालत असेल तर सारंच व्यर्थ आहे!). मात्र एकप्रकारचं killer instinct त्यांना वाद घालण्यापासून थांबवू शकत नाही!
ह्यात अजून एक इंटरेस्टिंग underlying प्रक्रिया असते! आपण पत्त्यांत challenge खेळतो तेव्हा जो शेवटी पत्ते लावतो त्याला पुढची उतारी मिळते! या वादांमध्येदेखील ते शेवटचं "और एक" प्रत्येकाला म्हणायचं असतं! To have the last word! जे थोडेफार माझ्या स्वभावात आहे. पण ही गोष्ट चांगली नसते!
वाद घालण्यात एक मजा असते आणि मला वाद घालायला आवडतं. पण हा pattern लक्षात आल्यापासून काही गोष्टी मी स्वतःपुरत्या तरी follow करण्याचा प्रयत्न करते.
एक, जरी वाद घालताना आपण एक बाजू मांडली असली तरी वाद संपल्यावर आणि मुख्य म्हणजे डोकं थंड झाल्यावर दुसऱ्याने मांडलेल्या बाजूचा पुन्हा विचार करून पहावा. बरेचदा काहीतरी चांगले हाती लागते!
दोन, ह्या वादातून फारसे काही निष्पन्न होणार नसल्याचे लक्षात आले की let's agree to disagree म्हणून लगेच वाद मिटवून टाकावा! वेळ पडली तर सपशेल माघार घ्यावी! संबंधात उगीच कटुता येण्याचे chances कमी होतात.
ह्या वाद घालण्याच्या प्रोसेसकडे डोळसपणे पाहायला लागल्यापासून माझी वाद घालण्याची खुमखुमी थोडी कमी झाल्येय आणि (माझी आणि इतरांची) मन:शांती थोडीशी वाढल्येय यात वादच नाही!

No comments:
Post a Comment