भारतात सुट्टीवर आल्यावर at the back of the mind एक प्रश्न सतत वाजत असतो: इथे असं काय आहे जे अमेरिकेत नाही? थोडं अवांतर वाटेल पण या सुट्टीत विजया मेहतांचं झिम्मा वाचत होते. त्यात नाटकातून प्रेक्षकांपर्यंत कशा आणि किती प्रकारे पोहोचता येतं ह्याचा त्यांनी घेतलेला शोध मांडला आहे. नाटक ही मुख्यत: दृक-श्राव्य करमणूक आहे. म्हणजे प्रेक्षक आपले कान आणि डोळे ह्या दोनच इंद्रियांचा वापर करत असतो. आणि मधेच कुठेतरी विजया बाईंनी एका नाटकात वातावरण निर्मिती साठी धूप/अगरबत्ती जाळल्याचा उल्लेख केला आहे. शिवाय म्हणे बालगंधर्व त्यांच्या प्रेक्षकांसाठी अत्तरदाणी ठेवायचे, स्वत: उंची अत्तरं वापरायचे. त्याक्षणी एकदम मला युरेका म्हणावसं वाटलं! वास! गंध! आपलं नाक देखील आपल्याला भोवतालच्या जगाबद्दल ज्ञान देत असतंच की!
आणि भारत हा अत्यंत गंधित देश आहे! दोन्ही सुगंध आणि दुर्गंध इथे सुखाने नांदतात!सध्या घरामागच्या building मध्ये एक ओली बाळंतीण आहे. सकाळी सकाळी तिच्यासाठी केलेल्या धुरीचा वास brush करत असताना गच्चीत रेंगाळतो. मग स्वैपाकघरातून दरवळणारे विविध पदार्थांचे वास, रस्त्यावरून जाताना येणारे फळांचे, भाज्यांचे, गाडीवरच्या पदार्थांचे वास.
कुठल्याश्या घरासमोरून जाताना बागेत फुललेल्या फुलांचे सुवास!आणि हो गटाराच्या घाणीचा /कचराकुंडीचा/ मुतारीचा दुर्गंध देखील :( त्या मानाने अमेरिका अगदीच sterile!
ह्या साऱ्या गंधित विचारांतून मला सुचलेली कल्पना म्हणजे एखाद्या नाटकाच्या प्रयोगात गंधाचा वापर! म्हणजे समजा पाऊस पडतो आहे आणि सभागृहात ओल्या मातीचा सुवास पसरला. किंवा तिने मोगऱ्याचा गजरा माळला आहे आणि प्रेक्षकांना त्याचा सुगंध येतो आहे! It'll really spice up the show नाही का?

No comments:
Post a Comment