Tuesday, January 1, 2013

अशास्त्रीय प्रयोग!

काही लोकं आरामात सगळं देवाच्या भरवश्यावर सोडून मोकळी होतात! मला हे असं १००% देवावर/दैवावर विश्वास टाकणं जमत नाही. थोड्या तर्काबुद्धीने विचार करणाऱ्यांची देवभोळ्या जगात पंचाईत होते. देव सर्व काही ठीक करेल हा विचार छान soothing असला तरी आत कुठेतरी पक्कं माहिती असतं की आपण हातपाय हलवले नाहीत तर काहीही होणार नाहीये!
आयुष्य हे अशास्त्रीय प्रयोगाचं एक उत्तम उदाहरण आहे! कारण ह्यात कधीच positive control असत नाही आणि negative control ठेवता येत नाही!
' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' मधलं गाणं एकदम apt वाटतं कधी कधी!
ह्या रस्त्यावर चालत असता वाटत राही
त्या रस्त्याने गेलो असतो असेच काही
दुविधा इथली अजून काही संपत नाही!

1 January 2013

ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस याने आपले तत्वज्ञान छोट्या छोट्या तत्वांच्या स्वरूपात मांडून ठेवले आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे संतदेखील होणारे दृष्टांत मांडून ठेवत असत. आपल्याला देखील कधी कधी वाटतं की हे कुठेतरी नोंदवायला हवं. तेव्हा मनात ही कल्पना आहे की मी देखील ह्या वर्षीपासून हे असे दृष्टांत लिहून ठेवणार आहे. ह्या अशा युरेका moments च आपले growth points असतात. येत्या वर्षात अशा अनेक eureka moments आयुष्यात येवोत आणि त्या लिहूनही ठेवल्या जावोत!

वास!

भारतात सुट्टीवर आल्यावर at the back of the mind एक प्रश्न सतत वाजत असतो: इथे असं काय आहे जे अमेरिकेत नाही? थोडं अवांतर वाटेल पण या सुट्टीत विजया मेहतांचं झिम्मा वाचत होते. त्यात नाटकातून प्रेक्षकांपर्यंत कशा आणि किती प्रकारे पोहोचता येतं ह्याचा  त्यांनी घेतलेला शोध मांडला आहे. नाटक ही मुख्यत: दृक-श्राव्य करमणूक आहे. म्हणजे प्रेक्षक आपले कान आणि डोळे ह्या दोनच इंद्रियांचा वापर करत असतो. आणि मधेच कुठेतरी विजया बाईंनी एका नाटकात वातावरण निर्मिती साठी धूप/अगरबत्ती जाळल्याचा उल्लेख केला आहे. शिवाय म्हणे बालगंधर्व त्यांच्या प्रेक्षकांसाठी अत्तरदाणी ठेवायचे, स्वत: उंची अत्तरं वापरायचे. त्याक्षणी एकदम मला युरेका म्हणावसं वाटलं! वास! गंध! आपलं नाक देखील आपल्याला भोवतालच्या जगाबद्दल ज्ञान देत असतंच की!
आणि भारत हा अत्यंत गंधित देश आहे! दोन्ही सुगंध आणि दुर्गंध इथे सुखाने नांदतात!सध्या घरामागच्या building मध्ये एक ओली बाळंतीण आहे. सकाळी सकाळी तिच्यासाठी केलेल्या धुरीचा वास brush करत असताना गच्चीत रेंगाळतो. मग स्वैपाकघरातून दरवळणारे विविध पदार्थांचे वास, रस्त्यावरून जाताना येणारे फळांचे, भाज्यांचे, गाडीवरच्या पदार्थांचे वास.
कुठल्याश्या घरासमोरून जाताना बागेत फुललेल्या फुलांचे सुवास!आणि हो गटाराच्या घाणीचा /कचराकुंडीचा/ मुतारीचा दुर्गंध देखील :(  त्या मानाने अमेरिका अगदीच sterile!
ह्या साऱ्या गंधित विचारांतून मला सुचलेली कल्पना म्हणजे एखाद्या नाटकाच्या प्रयोगात गंधाचा वापर! म्हणजे समजा पाऊस पडतो आहे आणि सभागृहात ओल्या मातीचा सुवास पसरला. किंवा तिने मोगऱ्याचा गजरा माळला आहे आणि प्रेक्षकांना त्याचा सुगंध येतो आहे! It'll really spice up the show नाही का?