Saturday, August 1, 2009

शिकवा आणि शिका!

ऑस्टिन ला परत आल्यानंतर एका आठवड्यात माझी teaching assistantship सुरु झाली. इथल्या universities मध्ये graduate (PhD) students ना funding चे दोन पर्याय उपलब्ध असतात. Graduate Research Assistantship (GRA) किंवा Teaching Assistantship (TA). मला पहिल्या वर्षी GRA मिळाली होती त्यामुळे केवळ lab मध्ये काम केलं की पैसे मिळत होते! आता मी जी lab join केली आहे तिथे इतक्या सहजी GRA मिळत नाही. (खूप जास्त सांगत नाही कारण मूळ विषय तो नाहीये). असो तर त्यामुळे या summer sem पासून मी TA करायला सुरुवात केली. माझा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे खूप काही सांगण्यासारखं आहे!

शिवाय सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने सगळेच जरा निवांत आहोत त्यामुळे जरा मजा मजा चालू आहे ( in and around Austin) तेही सांगावं असं मनात आहे. बघू एका मेल मध्ये मावलं नाही तर पुढच्या वेळी!

प्रथम Teaching Assistant म्हणजे नक्की काय ते सांगते. इथल्या विद्यापीठांमध्ये प्रत्येक विषय हा अनेक professor शिकवत असतात. म्हणजे उदा. Introductory Biology हा विषय ते professors त्याच सेमिस्टर ला शिकवत असतात. आणि विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार/वेळापत्रकानुसार आणि आवडीनुसार त्यापैकी कोणत्याही एका Professor कडून तोच विषय शिकू शकतात.अर्थात एका वर्गाची विद्यार्थिसंख्या मर्यादित असते. प्रत्येक Professor ला आपला course design करण्याचे बऱ्याच अंशी स्वातंत्र्य असते. म्हणजे कशा आणि किती परीक्षा घ्यायच्या वै. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे TA. General duties of a TA include auditing all the lectures, conducting discussion sessions, holding office hours and proctoring and grading exams. अर्थात TAship मध्ये विविध प्रकार असतात आणि सर्व TAs ना वरील पैकी काही/सर्व गोष्टी कराव्या लागतात. माझ्या TA मध्ये मी या सर्व गोष्टी केल्या. आता या पैकी प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगते.

1. Auditing classes: TA has to attend all the classes conducted by the professor.

2. Holding office hours: मुलांना वर्गात शिकवलेल्या काही गोष्टी कळल्या नाहीत तर आठवड्यातल्या एका ठराविक दिवशी मुल TA ला येऊन भेटू शकतात आणि चर्चा करू शकतात.

3. Conducting discussion sessions: हे TA सगळ्यात महत्वाचं काम. discussion session मध्ये साधारणत: lecture मध्ये शिकवलेल्या भागावर छोटीशी Quiz तयार करून मुलांना practice साठी सोडवायला द्यायची आणि मग त्याची उत्तरं discussion करायची असा format असतो.

मी Molecular Biology ह्या विषयाची TA होते. Summer courses are very compressed and hence hard and usually those who want to graduate early opt for summer courses. माझ्या वर्गात ४५ विद्यार्थी होते. मात्र discussion session ला या ४५ जणांचे दोन गट केले होते म्हणजे personal attention देता येत.

या TAship च्या दरम्यान एकूण अमेरिकन शिक्षणपद्धती बद्दलच्या माझ्या ज्ञानात बरीच भर पडली. इथल्या मुलांना एकुणातच खूप जास्ती choice असतो. म्हणजे उदा. एकाच वेळी विद्यार्थी music, biology, french and computer science अशा विषयातले courses घेऊ शकतो. आणि आपल्या आवडीनुसार पुढे जाऊन एखाद्या विषयात major करू शकतो. प्रथम दर्शनी ही पद्धत खूप छान वाटली तरी तिचे काही तोटेही आहेत. उदा. इतकी लवचिकता असल्यामुळे मुलं लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत आणि त्यातून काही जणांची एक धड अशी अवस्था होऊ शकते. भारतीय मुलं त्यामानाने बरीच focussed असतात. अर्थात त्यांना पर्यायही नसतो म्हणा! त्यामुळे इथे "How old are you?" या प्रश्नाला "25 years" असं उत्तर दिलं तर " ओह! I hardly knew what I wanted to do when I was 25!" अशी प्रतिक्रिया सर्रास मिळते! इथे पहिली ते कॉलेज एकत्र एका बेंचवर बसून शिकलो असं सांगणारे आढळणारच नाहीत कारण प्रत्येक विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार courses घेतो त्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे timetable असते. त्यामुळे Molecular biology ला येणारी दोन मुलं केवळ त्याच class पुरती आणि semester पुरती भेटतात. मला माझ्या वर्गात तरी बेशिस्त विद्यार्थी आढळले नाहीत. मुलं बरेचदा वर्गात laptop उघडून facebook check कर, chat कर असे उद्योग करत असतात. ही मुलं एकमेकांना फारशी ओळखत नसल्यामुळे वर्गात बसून गप्पा मारणे, चिठ्ठ्या पाठवणे असले उद्योग करत नाहीत याचे मला फार वाईट वाटले! एकूणच अमेरिकन लोक दुसऱ्याच्या आयुष्यात फारशी ढवळाढवळ करत नाहीत. आणि आपल्या भारतीय मनोवृत्तीला ते समजणे फार अवघड आहे. म्हणजे इथले पालक मुलांवर काहीही लादत नाहीत. ते केवळ त्याला advice देतात. त्याचप्रमाणे इथले शिक्षक देखील मुलांसाठी उपलब्ध असतात, त्याचं समाधान होईपर्यंत समजून द्यायला तयार असतात पण जर तुम्ही त्यांना approach केलत तरच! नाहीतर कोणीही शिक्षक "तू हे असं कर" असं आज्ञार्थी वाक्य उच्चारणार नाही! A very common way of putting your opinion here is "If I were you or I would do it this way!" People usually only advice each other. The final decision is all up to that person and so is the entire responsibility of it. हे पाहिलं कि आपल्याकडचे मुलाच्या वतीने त्याच्या career चे सर्व निर्णय घेणारे आईबाबा, बायकोचे निर्णय स्वत: घेणारे नवरे आठवतात आणि हसू येत! अर्थात या दोनपैकी काय अधिक चांगलं हे ठरवणं खूप अवघड आणि जवळजवळ अशक्य आहे. पण काही प्रमाणात मला आपल्या इथली पद्धत जास्ती योग्य वाटते विशेषत: मुलांचे निर्णय घेण्यात असलेला पालकांचा सहभाग. आपल्या नकळत्या वयात, जगाची पूर्ण ओळख नसताना कधीतरी दुसऱ्याच्या सल्ल्याने चालण्यात फायदा असतो! असा विचार केला तर आपल्यापैकी प्रत्येकाला स्वत:च्या बाबतीत एखादातरी प्रसंग आठवेल याची मला खात्री आहे!

TA करताना जाणवलेली दुसरी गोष्ट म्हणजे इथे उपलब्ध असलेल्या सोयी! प्रेमात पडावं अशी सुंदर stationary! आणि मला प्रचंड आवडलेलं इथलं photocopy machine (म्हणजे xerox machine!). You won't believe पण या machine मध्ये चक्क xerox झालेली पानं staple होऊन बाहेर पडण्याची सोय आहे!! मी या course च्या पहिल्या परीक्षेच्या copies करायला गेले तेव्हा मला पानी प्रश्नपत्रिकेच्या ५० copies ( पाठपोट पानं xerox staple करून) करायला मोजून १० मिनिट सुद्धा लागली नाहीत! त्याक्षणी मला आमचे कॉलेजच्या दिवसामधले केवळ xerox वाल्याच्या समोर उभं राहून घालवलेले असंख्य तास आठवले! गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात हे काही खोटे नाही! इथल्या कमी मनुष्याबलामुळे इथे अनेक efficiency वाढवणाऱ्या सोयी आहेत झालं!

इथली शिकविण्याची पद्धत आपल्यापेक्षा फारशी वेगळी नसली तरी approach मध्ये बराच फरक असतो! इथे मुलांसाठी सर्व sources उपलब्ध असतात. काही विद्यापीठांमध्ये lectures रेकॉर्ड करून पुन्हा ऐकता येतात. गेल्या सेमेस्टर ला माझ्या वर्गातला एक मुलगा (not my TA class) Josh सर्व lectures video record करायचा आणि मग परीक्षा जवळ आली कि त्याच्याकडून सगळेजण lectures च्या DVDs घ्यायचे. अर्थात प्रत्येक professor ची त्याने दरवेळी परवानगी विचारली तेव्हा त्या professors नी दिलेली उत्तरं ऐकण्यासारखी आहेत! Dr.Chan is a very jolly professor so his reaction was "I see, I have no problems if you keep the lectures to yourself but I will definitely sue you if I see myself on YouTube one fine day!" The whole class broke into laughter!! Second time when another lady professor Dr.O'Halloran asked Josh said he was too old to memorize so many things! (and that's true, he's 37!) On this she replied "Yeah true, when you get old memory is first one to leave!" That's such a sporting spirit shown by these professors which I always appreciate. Even while teaching in the class they are always ready to accept their mistakes, appreciate other viewpoints and encourage students to express themselves. आपल्या इथे शिकवताना लपवाछपवी चालते ती इथे आजीबात नाही. हातच राखून शिकवायचं आणि मग परीक्षेत नेमका तेच विचारायचं असा प्रकार नाही. इथे परीक्षेत वेगळी उत्तरपत्रिका नसते प्रश्नपत्रिकेवरच उत्तरं लिहायची असतात (म्हणजे पेपर देऊन घरी आल्यावर पुन्हा आईपुढे बसून सोडवण्याची वेळच येत नाही!) मुलं बरेचदा पेन्सिलीने उत्तरं लिहितात. इथल्या पेपर तपासण्याच्या पद्धतीप्रमाणे you start with the assumption that the student has got full marks so while grading you don't give points but just take points off for wrong answers. It comes to one and the same result but the approach makes the difference!

अजून एक सतत जाणवणारी गोष्ट म्हणजे इथले नियम. अमेरिकेत ज्या गोष्टी सर्वांनी पाळल्या पाहिजेत अशा गोष्टींसाठी नियम असतात जे सर्वजण पाळतात आणि नियम मोडला तर दंड असतो. मात्र या समाजात फारसे अलिखित नियम/ संकेत जवळजवळ नाहीतच!! याउलट आपल्याकडे पाहिलं तर मूठभर नियम आहेत जे पाळले पाळले तरी फारसा फरक पडत नाही आणि जोडीला खंडीभर अलिखित संकेत किंवा शिष्टाचार आहेत जे लोकं आवर्जून पाळत असतात आणि पाळल्यास समोरच्याला असंस्कृत किंवा असभ्य ठरवायला मागेपुढे पाहत नाहीत! म्हणजे वर्गात वेळेवर येणे हा नियम आहे पण शिक्षकांचा आदर करणे हा संकेत आहे. (आता तो तुम्ही मनापासून करता कि केवळ देखल्या देवा दंडवत असतो हा मुद्दा वेगळाच!) यावरून एक किस्सा आठवला. MSc मध्ये माझा एक मित्र एकदा सकाळच्या पहिल्या लेक्चरला आला नाही. ते लेक्चर आमच्या HoD चं होतं. लेक्चर झाल्यावर आम्ही सरांबरोबर बाहेर आलो तर जिन्यात माझा मित्र भेटला.सरांनी त्याला लेक्चरला का आला नाहीस असं विचारल तेव्हा तो म्हणाला "Sorry sir but I did not get up on time!" त्याच हे अत्यंत प्रामाणिक उत्तर ऐकून आम्हाला सगळ्यांना हसू फुटलं! सरांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे झाले होते! आश्चर्याने ते उद्गारले " But this can not be a reason!!" म्हणजे थोडक्यात he was expecting a lame excuse but telling truth was a shock!! मला आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल संपूर्ण आदर आहे आणि अभिमान सुद्धा पण तरीही आपण ज्या अनावश्यक संकेतांमध्ये स्वत:ला जखडून घेतले आहे त्यातून आपल्या संस्कृतीची विशेष जोपासना होते असे मला वाटत नाही. इथे मिळणाऱ्या अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्याचा मी पुरस्कार करणार नाही पण त्याच्या जोडीला जे मानसिक स्वातंत्र्य मिळत त्याचा बरेचदा हेवा वाटतो! समोरच्या व्यक्तीला थोडासा तरी benefit of doubt द्यायला आपण शिकलो तर भारत काही अंशी खऱ्या अर्थी स्वतंत्र होईल असं वाटत.

Well, बरीच मोठी मेल झाली! अजून खूप काही सांगायचं राहिलंच आहे. पण आत्ता इथेच थांबते! जाता जाता एक शेवटचा अनुभव! काही दिवसांपूर्वी इथे पं. हरिप्रसाद चौरासिया आणि राकेश चौरसियांच्या मैफिलीला गेलो होतो. तिथे गेलो तर झाडून सगळं मराठी पब्लिक! आमची जाम पंचाईत झाली! हक्काच्या मातृभाषेतून इथे comments करण्याची इतकी सवय झालेय इथे! असो, तर खर सांगायचं तर मी सुरुवातीला थोडीशी conscious होते! शास्त्रीय संगीतातलं मला फारसा कळत नाही त्यातून हे म्हणजे instrumental! पण कार्यक्रम सुरु झाला आणि मजा यायला लागली! आमच्या पुढच्या ओळीत बसलेले एक मराठी काका तर सतत खूष होऊन दाद देत होते! मी आपली मनापासून ऐकत होते आणि ऐकता ऐकता एका क्षणी माझ्याही नकळत माझ्या तोंडून " आहा क्या बात है!!" कधी बाहेर पडल ते माझं मलाच समजल नाही! राकेश चौरासियांनी एक खूप सुरेख जागा घेतली होती कारण माझ्या बरोबर अनेक जणांनी दाद दिली! That was an enlightened moment for me! संगीताची भाषा किती ताकदवान आणि universal असते ते मला त्याक्षणी कळलं! अजूनही मी त्या आनंदात तरंगत आहे!! त्यातला थोडासा आनंद तुमच्यापर्यंत या मेल मधून नक्की पोहोचावा हीच इच्छा!

No comments:

Post a Comment