भारतातून परत येऊन आज बरोब्बर एक आठवडा झाला! मुंबई एअरपोर्ट वर विमान उतरल्यावर जो आनंद झाला तो केवळ शब्दातीत आहे! आमचं विमान उतरल तरी ground crew ची तयारी झाली नव्हती आणि म्हणून १० मिनिटं सगळे विमानातच बसून होतो. तेव्हा खात्रीच झाली कि माझ्या प्रिय मायभूमीवर विमान उतरलं आहे!! पण त्याक्षणी गेलेल्या वेळाचा त्रास नाही झाला उलट बरं वाटलं..वाटलं कि चला अजूनही सगळं तस्सच आहे! कसाही असला तरी आपला तो नेहमी बाळ्याच असतो ना! गंमत म्हणजे विमानात बसून मी कोणता सिनेमा पहिला असेल? Slumdog Millionaire! हा मी बघणं अशक्य झाल्यामुळे मधेच सोडून दिला होता तो पाहायचा मुहूर्त असा लागला!
असो..पहिले काही दिवस घरातच होते! भारतात येऊन बहुतेकांशी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेट झाल्यामुळे मी त्याबद्दल लिहायचं नाही असं ठरवलं आहे. त्याऐवजी मला भारतात कसं वाटलं, काय गोष्टी बदललेल्या वाटल्या आणि काही खास अनुभव याबद्दल लिहावं असं मनात आहे.
एकतर जसं अमेरिकेत आल्यावर फारसं वेगळं वाटलं नाही तसच भारतात आल्यावरही फार वेगळं वाटलं नाही! एक जाणवलं की अमेरिकेत फिरताना वावरताना शांतता वाटते, सुकून वाटतो..असं वाटतं की तुमच्या हातात भरपूर वेळ आहे..कसली घाई गडबड, गोंधळ, चिंता नाही exact शब्द म्हणजे hassle-free life आहे. या उलट भारतातली माणस सतत घाईत असतात, कुठल्या तरी चिंतेत असतात. हे चित्र फक्त निराशाजनक वाटत असेल तर तसं नाहीये कारण या scenerio च दुसऱ्या शब्दात वर्णन करता येईल. इथल्या लोकांचं fighting spirit फार कमी आहे कारण दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टी इथे मुबलक आणि easily उपलब्ध आहेत. जगण्यासाठी struggle हा प्रकार जवळजवळ नाहीच. अर्थात तरीही इथली लोक stressed असतात. आणि ती सर्वात सुखी आहेत असंही नाही. या उलट भारतात इतकं झगडावं लागत असूनही लोक सदैव दुखा:त आहेत असं दिसत/जाणवत नाही. उलट एका fighting spirit नी लोक परिस्थितीशी लढत असतात. शक्य तशी शक्य तितकी मजा करत असतात! माझं या दोन्ही देशांचं वर्णन प्रातिनिधिक नाही पण एका विशिष्ठ दृष्टीकोनातून केलं आहे. भारत आणि अमेरिकेचं वर्णन करा असं म्हटलं की मला हत्ती आणि ६ आंधळ्यांची गोष्ट आठवते. इतकी विविधता या दोन्ही देशांमध्ये आहे. मात्र कोणत्याही दृष्टीकोनातून पाहिलं तरी या मागचं कारण एकच आहे. अमेरिका हा एक विकसित देश आहे आणि भारत विकसनशील देश आहे. मला एक उपमा सुचतेय ती देण्याचा मोह आवरत नाही! जेव्हा आपण किल्ला चढत असतो तेव्हा चढताना दम लागतो, थकायला होतं, घाम येतो, मधेच पाय घसरून पडतो..पण शेवटी माथ्यावर पोचल्यावर सर्व कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटतं आणि मग तिथवर पोचण्यासाठी घेतलेल्या कष्टांची मजा वाटू लागते...तसच भारतातले लोक सध्या चढणी वर आहेत आणि अमेरिकेतली लोकं माथ्यावर. आत्ता जसा struggle भारतीय लोक करत आहेत ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात अमेरिकन लोकांनी केलं आहे. जसं एखाद शिखर सर केल्यावर गिर्यारोहकाला त्याहून उंच शिखरं खुणावू लागतात त्याच प्रमाणे अमेरिकन लोक देखील सतत नवीन गोष्टींच्या शोधात असतात. मजा चढण्यातही आहे आणि माथ्यावरही! असा विचार केला की मग दोन्ही देशातल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी एकाच तटस्थ भावनेने निरखता येतात असं मला वाटतं. या वेळी मी घरी पुन्हा एकदा पु. लं. च अपूर्वाई वाचत होते तेव्हा realise झालं की पु.लं.नी ही भूमिका आपल्या सर्व प्रवासवर्णनातून फार छान मांडली आहे! कोणत्याच संस्कृतीचे अवास्तव गोडवे नाहीत की उगीच अनावश्यक टीका नाही! Hats off to him once again!
गाडी फारच serious वळणावर वर गेली! आता एक गम्मत सांगते. आल्यानंतर २/३ दिवसांनी काहीतरी घ्यायला दुकानात गेले. पैसे परत घेताना लक्षात आलं की दुकानदाराने फाटकी नोट दिली आहे! ताबडतोब ती नोट त्याला परत केली आणि चांगली नोट घेतली! असं थोडसं भांडल्यावर इतकं बरं वाटलं! काय सांगू!
मी येताना ठरवलं होत आजीबात “US returned” सारखं वागायचं नाही. आपण इथलेच आहोत १० महिने परदेशात काढले म्हणून काही फरक पडता कामा नये! आणि मग बिनधास्त सगळीकडे जाऊन सगळं खाल्लं! ST, PMT, रिक्षा, ट्रेन सगळ्यातून प्रवास केला. अर्थात देवाच्या कृपेने आजारी पडले नाही म्हणून आज हे लिहू शकतेय [;)]
India trip plan करताना आणखी एक गोष्ट ठरवली होती ती म्हणजे आर्या आंबेकर आणि शमिका भिडे ची भेट घ्यायची. या सर्वच little champs नी इतका भरभरून आनंद दिला की खरतर त्यांच्यापैकी प्रत्येकाला भेटून "thank you" म्हणावसं वाटत होतं पण वेळेअभावी ते शक्य नव्हतं. मात्र माझी सगळ्यात आवडती champ शमिका भिडे आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले आर्या आणि प्रथमेश दोघांनाही आवर्जून भेटले (आर्याला प्रत्यक्ष तर प्रथमेशशी फोन वर बोलले). शामिकाला all the way रत्नागिरी ला जाऊन भेटले! That evening was the best evening I spent in India! मला वाटत नाही की मी त्या वेळी झालेला आनंद आणि समाधान शब्दात व्यक्त करू शकेन! I will cherish those moments all my life! अर्थात या माझ्या आनंदात मोठा वाटा आहे ज्यांनी ज्यांनी मला या champs पर्यंत पोचायला मदत केली त्या सगळ्यांचा! माझी आई, माझ्या मैत्रिणी केतकी आणि अमृता, youtube वर little champs च्या पर्वाचे vedios upload करणारा अहोंकन उर्फ अश्विन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुलांचे आई-बाबा आणि कुटुंबीय! मी या सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे! It was like a dream come true! या भेटीमधून little champs च्या अजून काही गमतीजमती कळल्या! मजा आली!
सर्व जवळच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना भेटले, मनसोक्त गप्पा मारल्या, खाण्यापिण्याच्या सर्व फर्माइशी पूर्ण केल्या! आवश्यक त्या खरेद्या केल्या आणि हे सगळं करता करता एक महिना कसा भुर्रकन उडून गेला कळलंच नाही! परत जायची वेळ आली! पुन्हा सामानाची बांधाबांध, वजनकाट्यावरची मोजणी आणि हिशोब! परत येताना विमानात बसल्यावर मनात संमिश्र भावना दाटून आल्या! (फार पुस्तकी वाक्य झालंय हे पण आता मराठी भाषा पुस्तकातच ठेवायची असं आपण ठरवल्यामुळे ते स्वाभाविक आहे! मी जर "mixed emotions" असं लिहिलं असतं तर पटकन कळलं असतं कदाचित असो!) जाम वाईट वाटत होतं पण कुठेतरी मनात समाधान देखील होतं. मनासारखी सुट्टी घालवल्याचं, सगळ्या जवळच्या व्यक्तींना भेटल्याचं, घरी लोळून आळसात घालवलेल्या दिवसांचं, पाणी पुरी, मोदक, भेळ सामोसा, बटाटेवडा, जिलबी असे अनेक पदार्थ खाल्ल्याचं, स्वयंपाक, भांडी घासणे, कपडे धुणे, कचरा आवरणे इत्यादी चिंतांपासून महिनाभर दूर राहिल्याचं, माहेरपणाचं...विमानाने take off घेतला..मी डोळे मिटले तेव्हा डोळ्यातून पाणी आलं मात्र ते पाणी कसलं होतं हे मला अजूनही उमगलेलं नाही! इति!
No comments:
Post a Comment