सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा मी भारतात होते. आधीचं एकही सारेगमप च पर्व मी पाहिलं नव्हतं.फार फार तर टीका करण्यापुरता एखादा episode पाहीला होता..पण लिटिल चॅम्प्स सुरु झाल्यापासुन जी मज्जा सुरु झाली ती ६ महिन्यांच्या आनंदपर्वाची सुरुवात होती! इथे आल्या आल्या भारतातल्या सर्व करमणुकीच्या sources चा शोध लागला त्यातुन मग YouTube, GluTV, marathitube, aapalimarathi अशा सगळ्या websites बघणं सुरु झालं. लिटिल चॅम्प्सचं मनावरचं गारुड दिवसेंदिवस वाढतच गेलं. Finals सुरु झाल्या आणि आपल्या आवडत्या लिटिल चॅम्प्साठी fielding लावणं सुरु झालं! आयुष्यात पहिल्यांदा कुठल्याही टिव्ही शो मधे इतकी involvement वाटतं होती.
या सर्वच लिटिल चॅम्प्स नी इतका आनंद दिला!! अजुनही देत आहेत. मला लिटिल चॅम्प्स ने काय दिलं असा विचार केला की कित्तीतरी गोष्टी सुचू लागतात. मराठी गाणी ऐकणं आधीदेखिल आवडत होतच पण आता आम्हा सगळ्यांना त्या गाण्यांची गोडी लागली आहे. येताजाता आता ओठांवर मराठी गाणी असतात. आधी कधी न ऐकलेल्या नाट्यगीतापासून ते थेट आजच्या मोरया मोरया पर्यंत!!
आणि ही सगळी मुलं आता अक्षरशः "घरातली" झाली आहेत!! कोकणकन्या शमिका, pretty young girl आर्या, उकडीचा मोदक प्रथमेश, little monitor मुग्धा, little record-maker कार्तिकी, future combo music director रोहित, शाल्मली (टिपरे) सुखटणकर, अवंती सगळेच!! मला गाण्यातलं फारसं काही कळत नाही पण ही मुलं जे गात होती ते त्यांच्या वयाच्या पलीकडलं होतं एवढं नक्की! त्यांच्या सगळ्या गाण्यांमधे झालेल्या गमती-जमती, काही अविस्मरणीय episodes (शन्कर महादेवन, हरिहरन, ह्रदयनाथ मंगेशकर मान्यवर परीक्षक म्हणुन आले होते ते episodes आणि दिवाळी विशेष, २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर झालेला श्र्द्धांजली चा भाग आणि खास पं ह्रदयनाथ मंगेशकरांनी गाणी बसवून घेतलेला २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेष भाग ) पुन्हा पुन्हा बघावसे वाटतात!
लिटिल चॅम्प्समुळे अवधूत आणि वैशाली ची मनातली केवळं remix गाणारे अशी image बदलली. त्यांच्या friendly वागण्यामुळे ही मुलं एकदम लवकर रुळली यात शंकाच नाही. ती दोघंही या मुलांचा दर्जा पाहता best judges नव्हते but they both did the best job!! वाद्यवॄंद एक नंबर आणि पल्लवी….ती तर कार्यक्रमाची शान आहे!! तिचं इंग्रजीमिश्रीत मराठी खिल्ली उडवायला मस्तच.."दोन्ही गाण्यांसाठी दोन्ही परीक्षकांकडून दोन दोन नी!!" ह्या वाक्याचा अर्थ तीच सांगू शकेल कदाचित!! अवधूत चं चाबूक, वैशालीचं भन्नाट सगळच अड्डस!!
मस्ती की पाठशाला च्या episodes मधे ही पोरं जी धमाल करत होती ती पहायला देखिल धमाल यायची!! संपूर्ण कार्यक्रमादरम्यान या सर्व मुलांनी जी खिलाडुवॄत्ती आणि maturity दाखवली तिने मनाला खुप दिलासा मिळाला. त्यांच्या पालकांचं देखिल खुप कौतुक वाटते. आर्याचे बाबा प्रथमेश च्या गाण्याला once more द्यायचे, या सगळ्या मुली मिळुन बिचार्या मुग्धाला इंग्रजी वरुन चिडवत असताना आर्याच्या आई तिची बाजु घ्यायची! या कार्यक्रमाची एक वेगळीच भट्टी जमली होती निर्मळ निखळ पवित्र आनंदाची..
माझ्यासाठी सगळेच लिटिल चॅम्प्स जिंकले कारण त्यांनी सर्वांची मनं जिंकली! आजही जेव्हा bore होतं, चिडचिड होते अशावेळी मी आपली लिटिल चॅम्प्स ची playlist लावते आणि मग डोळ्यांपुढे ती दॄश्य दिसायला लागतात, ओठांवर हसू येते आणि नकळत मन प्रसन्न होउन जातं!!
No comments:
Post a Comment